Mayur Ratnaparkhe
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५ नुसार, वॉलमार्टच्या वारसदार अॅलिस वॉल्टन या जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.
त्यांची एकूण संपत्ती १०२ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ८ लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे.
विशेष म्हणजे गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत ४६ टक्के वाढ झाली आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे वॉलमार्टच्या शेअर्समध्ये झालेली प्रचंड वाढ.
७५ वर्षीय अॅलिस वॉल्टनची खास गोष्ट म्हणजे त्या वॉलमार्टमध्ये कोणतेही कार्यकारी पद भूषवत नाही.
अॅलिस वॉल्टन कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी नसून त्या तिच्या वैयक्तिक व्यवसायांवर आणि कलात्मक आवडींवर लक्ष केंद्रित करतात.
अॅलिस वॉल्टन त्यांची संपत्ती फक्त बँक बॅलन्स वाढवण्यासाठी ठेवत नाहीत, तर त्यांचे महागडे छंद पूर्ण करण्यासाठी देखील खर्च करतात.
अॅलिस वॉल्टन यांना कला संग्रह आणि घोडेपालनाची विशेष आवड आहे.
असे म्हटले जाते की वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी पाब्लो पिकासोची प्रतिकृती चित्र खरेदी करून त्यांनी कलेची आवड निर्माण केली.
त्यांच्या कला संग्रहाची अंदाजे किंमत ५०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४००० कोटी रुपये) असल्याचे म्हटले जाते.