सरकारनामा ब्यूरो
अवघ्या 22व्या वर्षी इशिता गुप्ता यांनी UPSC परीक्षा करत इतिहास रचला आहे.
इशिता गुप्ता उत्तर प्रदेशतील हरदोई शहरातील रहिवासी असून त्यांनी 2024 ला UPSC परीक्षेत 154 वा रँक मिळवला आहे.
इशिता गुप्ता यांची आई अंजू गुप्ता, वडील आरपी गुप्ता हे दोघेही हरदोई शहरातील प्रसिद्ध डाॅक्टर असल्याने, त्यांना अभ्यासाठी प्रोत्साहन घरातूनच मिळाले.
त्यांनी यूपीतील सेंट झेवियर्स स्कूलमधून त्यांचे हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर दिल्लीतील वसंत कुंज येथील डीपीएस काॅलेजमधून 12वी पूर्ण केली.
इशिता यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ गर्ल्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
अपयश
त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिला होती. मात्र, त्यांना त्यात अपयशाचा सामना करावा लागला.
IPS अधिकारी
2023ला UPSC परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. त्यांच्या रँकसह त्यांची नियुक्ती IPS पदासाठी करण्यात आली.