सरकारनामा ब्यूरो
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी प्रियंका गांधींकडे आहे.
प्रियंका गांधी या ब्रिटीश राजवटीपासून भारतातील राजकारणावर वर्चस्व ठेवणारे नेहरू-गांधी घराण्याच्या वंशज आहेत.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव आणि सोनिया गांधींच्या कन्या तसेच राहुल गांधींच्या त्या बहीण आहेत.
वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी आपले पहिले भाषण केले.
सामाजिक, मानसिक तसेच स्व-जाणिवेसाठी त्यांनी 10 दिवस विपश्यना केंद्रात ध्यान केले.
उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोन्ही भागात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रियांका यांनी बौद्ध धर्माच्या अभ्यास विषयात एमए पदवी प्राप्त केली आहे.
निवडणुकाच्या वेळी त्यांनी सोनिया गांधींच्या प्रचाराचे व्यवस्थापन केले. तसेच त्यांच्यासाठी भाषणांचे लिखाणही केले होते.
प्रियांका गांधी सध्या सक्रिय राजकारणात आहेत.