Aslam Shanedivan
जगातील असा कोणताच कोपरा नाही जेथे महिला काम करत नाहीत. त्या पुरूषांच्या बरोबरीने देश चालवतात. आपल्या देशातही अशा कर्तबगार महिला आहेत
असेच काहीसे हिमाचलमधील लाहौल-स्पिती जिल्ह्यात चित्र असून येथे प्रशासनातील सर्वच प्रमुख पदावर महिला अधिकारी जबाबदारी सांभळत आहेत.
लाहौल-स्पिती जिल्ह्याच्या पहिल्या आयुक्त होण्याचा मान हा आयएएस अधिकारी किरण भडाना यांना जातो
तर येथील खासदार कंगना राणावत असून त्यांचा प्रवास हा चित्रपटाकडून राजकारणाकडे असा आहेत. तर येथील आमदारही महिलाच असून त्या अनुराधा राणा आहेत.
तसेच या जिल्ह्याच्या पोलिस प्रमुख पदावर पोलिस अधीक्षक म्हणून इल्मा अफरोज कार्यरत आहेत
तर लाहौल आणि स्पिती जिल्ह्याच्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून आकांशा शर्मा काम पाहत आहेत
तसेच येथील अतिरिक्त आयुक्त म्हणून शिखा सिमतिया या काम पाहत आहेत.