Mangesh Mahale
टोल वसूल करण्यासाठी मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोल प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही
गुजरात, हरियाणा येथे देशातील पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो प्रणाली सुरू करण्यात आली आहे.दिल्ली-एनसीआरमधील पाच टोल प्लाझावरही चाचणी सुरू आहे.
नव्या प्रणालीमुळे टोल प्लाझावर थांबावं लागणार नाही. ज्यामुळे ट्रॅफिक होणार नाही आणि इंधनाची बचत होईल
वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. साधारण 1500 कोटी रुपयांची बचत होईल असा नितीन गडकरी यांचा अंदाज आहे.
कमी इंधन खर्चामुळे प्रदूषण कमी होणार असून ही पर्यावरणपूरक यंत्रणा ठरणार आहे.
सध्याच्या फास्टटॅग प्रणालीला या नव्या प्रणालीत इंटीग्रेट केलं जाणार आहे.
एआयच्या मदतीने वाहनांची अचूक ट्रॅकिंग आणि टोल वसुली केली जाईल.
वर्षभरात देशभरातील टोल नाके बंद होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी संसदेत सांगितले.