Rajanand More
सिमी रोझबेल जॉन या केरळमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. मागील 30 ते 35 वर्षांपासून त्या पक्षात सक्रीय होत्या.
सिमी रोझबेल या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांमध्येही त्यांची ओळख होती.
पक्षात अनेक वर्षांपासून सक्रीय असल्या तरी कोणतेही मोठे पद किंवा आमदारकी, खासदारकीपासून वंचित राहिल्या.
काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांवर कास्टिंग काऊचचे गंभीर आरोप केल्याने प्रकाशझोतात आल्या. केरळमधील चित्रपटसृष्टीतील चर्चेनंतर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
कास्टिंग काऊचच्या आरोपांनंतर त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. आरोप खोटे असल्याचा केरळ काँग्रेसचा दावा.
नेत्यांची मर्जी सांभाळली नाही म्हणून आपल्याला राजकारणात पुढे संधी मिळाली नाही, असा गंभीर आरोप सिमी यांनी केला होता.
सिमी यांच्या आरोपांनंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रामुख्याने प्रियांका गांधी आता बोलणार का, असा सवाल नेत्यांनी केला आहे.