Vijaykumar Dudhale
सुमारे दोनशे एकरवर असंघटित कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या 15 हजार घरांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरूपात पाच कामगारांना घरांच्या चाव्या देऊन लोकार्पण करण्यात आले.
कामगारांना घरांचे वाटप करताना मोदी यांना आपले बालपण आठवले आणि ‘काश...बचपने में हमें भी ऐसे घर मिलते’ असे म्हणत मोदी भावूक झाले. काही वेळ त्यांना शब्दही फुटले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडम मास्तर यांच्यावर टिपण्णी केली. नरसय्या आडम हे २०१९ मध्ये सडपातळ होते, आता ते जाड झाले आहेत, तेही मोदी ग्यारंटीमुळेच, असा टोला त्यांनी लगावला.
मोदी यांनी या वेळी काँग्रेसच्या 1980 च्या निवडणुकीतील ‘आधी रोटी खाऐंगे...इंदिराजी को लाएंगे’ या घोषणेची खिल्ली उडवत क्यों आधी रोटी खाऐंगे... मोदी है...पुरी रोटी खाऐंगे असे म्हणत काँग्रेसला आव्हान दिले.
मोदी यांनी उपस्थितांसह देशभरातील नागरिकांना येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी रामज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थितांनी मोबाईल स्टॉर्च ऑन करून होकार दर्शविला.
मोदी यांनी निवडणुकीच्या अनुंषगाने सोलापुरातील पद्मशाली समाजात साखरपेरणी केली. अहमदाबादमध्ये पद्मशाली समाजाची अनेक कुटुंबे आहेत. लहानपणी मी महिन्यातून 3 ते 4 वेळा पद्मशाली कुटुबांत जेवण करायचो. बेताची परिस्थिती असतानाही त्यांनी मला कधी उपाशी झोपू दिले नाही, अशी आठवण सांगत मोदींनी पद्मशाली समाजाशी नाळ घट्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे सोलापुरातून निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.
निमंत्रण पत्रिका असूनही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तुम्हांला असणार 'नो एन्ट्री'!