क्रॉस वोटिंगमुळे पराभव, आता पुन्हा राज्यसभेचं तिकीट; माजी मुख्य सचिवांनी ढवळून काढले राजकारण

Rajanand More

आलोक रंजन

उत्तर प्रदेश केडरचे १९७८ च्या तुकडीचे सेवानिवृत्त IAS अधिकारी आलोक रंजन यांना समाजवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे नाव पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे.

Alok Ranjan | Sarkarnama

माजी मुख्य सचिव

आलोक रंजन यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे त्यावेळी मुख्यमंत्री होते.

Alok Ranjan | Sarkarnama

मुख्य सल्लागार

सेवानिवृत्तीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे मुख्य सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते १ जुलै २०१६ रोजी ३७ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत.

Alok Ranjan | Sarkarnama

मंत्रि‍पदाचा दर्जा

सल्लागारपदी असताना आलोक रंजन यांना कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा देण्यात आला होता. विविध सरकारी योजनांच्या निगराणीचे कामही त्यांच्याकडे होते.

Alok Ranjan | Sarkarnama

सुपर माईंड

मुख्यमंत्री असताना अखिलेश यांच्या सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये आलोक रंजन यांचे नाव घेतले जात होते. त्यांना अखिलेश यांचे सुपर माईंड म्हटले जायचे.

Akhilesh Yadav | Sarkarnama

राज्यसभेची उमेदवारी

वरिष्ठ सभागृहात अभ्यासू सदस्य पक्षाकडून जावा, यासाठी अखिलेश यांनी आलोक रंजन यांना २०२४ मध्ये पहिल्यांदाच राज्यसभेची उमेदवारी दिली होती.

Alok Ranjan | Sarkarnama

क्रॉस वोटिंग

सपाच्या काही आमदारांच्या कॉस वोटिंगमुळे आलोक रंजन यांचा पराभव झाला होता. अखिलेश यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता.

Alok Ranjan | Sarkarnama

पुन्हा उमेदवारी

आता अखिलेश यांना पुन्हा आलोक रंजन यांच्यावर विश्वास दाखवत दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली आहे. सध्याचे संख्याबळ पाहता आलोक रंजन यांचा राज्यसभेचा मार्ग सुकर असल्याचे दिसते.

Alok Ranjan | Sarkarnama

NEXT : धडाकेबाज IFS अधिकारी, विविध प्रकरणांमध्ये तब्बल 17 न्यायाधीशांची माघार

येथे क्लिक करा.