Pradeep Pendhare
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रालयाला, पेंटागॉनला तात्काळ अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की अमेरिकेला रशिया आणि चीनच्या पातळीवर अणुचाचण्या करण्याची गरज आहे.America Nuclear Weapons
अमेरिकेने शेवटची 23 सप्टेंबर 1992 रोजी नेवाडा इथं अणुचाचणी केली होती, त्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी भूमिगत अणुचाचण्यांवर बंदी घातली होती.
रशियाने अलीकडेच आपल्या अण्वस्त्रांची चाचणी घेतल्याने जागतिक तणाव वाढलेल्या असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की अमेरिकेकडे जगात सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत.
इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबोलिश न्यूक्लियर वेपन्सनुसार, रशियाकडे सुमारे 5,500 अण्वस्त्रे आहेत, तर अमेरिकेकडे सुमारे 5,044 आहेत.
व्लादिमीर पुतिन यांनी अणू हल्ल्यासाठी सरावाचे आदेश दिले. रशियन सैन्याने इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यार्स, सिनेवा क्षेपणास्त्र तसेच Tu-95 बॉम्बरमधून लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
डोनाल्ड्र ट्रम्प यांच्या अणुचाचणीच्या आदेशाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून, या निर्णयामुळे जागतिक निःशस्त्रीकरण प्रयत्नांना धक्का बसू शकतो.
या अणुचाचणीमुळे अमेरिकेने 1992मध्ये स्वाक्षरी केलेल्या अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे उल्लंघन देखील मानले जाऊ शकते.
अमेरिकेने पुन्हा चाचण्या सुरू केल्या तर त्यामुळे नवीन शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने दिला आहे.