US Iran Attack : अमेरिकेचा इराणवर पुन्हा भीषण हल्ला; अणुप्रकल्प, लष्करी तळ उद्ध्वस्त; युद्ध भडकणार!

Roshan More

ट्रम्प यांची घोषणा

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अधिकृतपणे शस्त्रसंधी संपल्याची घोषणा केली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच हे हल्ले झाले.

भीषण हवाई हल्ले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट इशाऱ्यानंतर अमेरिकन सैन्याने गुरुवारी पहाटे इराणवर मोठे हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे अत्यंत संवेदनशील अणुप्रकल्प, लष्करी तळ आणि दळणवळणाचे प्रमुख पूल उद्‌वस्त करण्यात आले आहेत.

अणुऊर्जा प्रकल्पाजवळ स्फोट

इराणमधील एकूण ९० प्रमुख लक्ष्यांवर भीषण बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. यामध्ये इराणच्या बुशहर येथील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात मोठे स्फोट झाले आहेत.

Sarkarnama

इराणचे १४ सैनिक ठार

गेल्या दोन दिवसांत झालेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश इराणच्या सैनिकांचा समावेश आहे.

US Iran Attack | Sarkarnama

अंत्यसंस्काराच्या दिवशीच हल्ला

गुरुवारी इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर मशहद शहरात अंत्यसंस्कार होत होते. मात्र, अगदी याच दिवशी अमेरिकेने मशहद शहराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर आणि दोन मोठ्या रेल्वे पुलांवर बाँब टाकून ते उडवून दिले.

इराणकडून आखाती देशांना लक्ष्य

अमेरिकेच्या या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने थेट अमेरिकेचे मित्रदेश असलेल्या आखाती देशांवर हल्ले चढवले आहेत. अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या कुवेत आणि कतार या देशांवर इराणने थेट क्षेपणास्त्रे डागली आहेत.

Iran vs US Israel War Satellite Images

बहरीनमध्ये भीतीचे वातावरण

अमेरिकन नौदलाच्या ताफ्याचे मुख्यालय असलेल्या बहरीनमध्ये गुरुवारी पहाटे लागोपाठ तीन वेळा धोक्याचे सायरन वाजले. या सायरनमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी इमारतींमधून बाहेर धावले.

US Iran Attack | Sarkarnama

इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन

इराणने डागलेली ३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, १ क्रूझ क्षेपणास्त्र आणि १० ड्रोन कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच पाडली.

US Iran Attack | Sarkarnama

NEXT अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला उशीर का? 8 महत्त्वाचे मुद्दे

Ayatollah Khamenei Funeral | sarkarnama
येथे क्लिक करा