Ayatollah Khamenei Funeral : अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला उशीर का? 8 महत्त्वाचे मुद्दे

Roshan More

मृत्यू कसा झाला?

28 फेब्रुवारीला तेहरानमधील निवासस्थानी हवाई हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला.

इस्लामिक परंपरेचा अपवाद

इस्लामिक परंपरेनुसार मृत्यूनंतर 24 तासांत दफनविधी अपेक्षित असतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे या नियमाला अपवाद करावा लागला.

Ayatollah Khamenei death | Sarkarnama

पार्थिव कुठे ठेवले?

धार्मिक नियमांचे पालन करत पार्थिव शीतगृहात सुरक्षित ठेवण्यात आले.आधुनिक शीतकरण तंत्रज्ञानाच्या मदतीने ते जतन करण्यात आले.

सुरक्षेला प्राधान्य

संभाव्य हल्ल्यांच्या धोक्यामुळे मोठा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यात आला.युद्धविरामानंतरच अंत्यविधीचा निर्णय घेण्यात आला.

चेंगराचेंगरीची भीती

1989 आणि 2020 मधील अंत्ययात्रांमध्ये चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे यावेळी प्रशासनाने अधिक काळजीपूर्वक नियोजन केले.

अंतिम दर्शनाची व्यवस्था

खामेनी यांचे पार्थिव तेहरानच्या 'मोसल्ला मशीद' संकुलात ठेवण्यात आले आहे.अंतिम दर्शनासाठी लाखो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दफनविधी कधी?

इराणमधील प्रमुख शहरांतून अंत्ययात्रा काढली जात आहे. त्यानंतर 9 जुलै रोजी मशहाद येथील इमाम रेझा दर्गा परिसरात दफनविधी होणार आहे.

131 दिवसांनी अंत्यविधी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला तब्बल 131 दिवसांनी सुरुवात झाली.अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे हा सोहळा लांबणीवर पडला.

NEXT : खामेनेई यांची अत्यंयात्रेला जनसागर; ट्रम्प यांचे विधान अन् मुज्तबा खामेनेई यांची गैरहजेरी चर्चेत!

Ali Khamenei Funeral | Sarkarnama
येथे क्लिक करा