सरकारनामा ब्यूरो
शिर्डीतील भाजपच्या एक दिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज प्रमुख उपस्थिती दर्शवली.
अमित शहांनी 2024 हे वर्ष भाजप सरकारसाठी कशाप्रकारे महत्त्वपूर्ण राहिलं हे सांगितले.
हिंदुत्वाला आणि मोदीजींच्या विकासाला स्वीकारत जनतेने 2024 ला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान केलं.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आमचे सरकार बनेल, असं स्वप्न पाहणाऱ्याचं स्वप्न भंग करत, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवले.
2024 मध्येच आम्हाला हरियाणात सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला.
2024 मध्येच आंध्र प्रदेशात पहिल्यांदाच एनडीए आघाडी विजयी झाली. हे 2024 चं वर्ष भाजपसाठी महत्वाचे ठरले आहे.
2024 मध्येच पहिल्यांदा ओडिशामध्ये पूर्ण बहुमताने कमळाचे सरकार बनले.
सिक्किम तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार निवडून आलंचं आमित शहांनी भाषणातून सांगितले.