सरकारनामा ब्यूरो
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता. 12 जानेवारी) वारणा समूहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील सर्वात मोठी रांगोळी साकारण्यात आली.
पन्हाळा तालुक्यामध्ये वारणा येथील सैनिक स्कूलमधील शाळेच्या पटांगणात 11 एकरात ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले की, देशाच्या इतिहासात आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी रांगोळी नव्हती.
उपक्रमासाठी वारणा परिसरातील जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेऊन ही रांगोळी पूर्ण केली आहे.
सहा महिन्यांपासून...
या उपक्रमासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रांगोळी काढण्यासाठी 400 हून अधिक जणांची टीम नियोजन करत होती.
रांगोळीसाठी जवळपास 35 टन पेक्षा जास्त रांगोळीचा वापर करण्यात आला.
ही रांगोळी आज (ता.12) रविवारपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली.
या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.