Aslam Shanedivan
आज (ता.12) शिवरायांची 345 वी पुण्यतिथी असून रायगडावर मोठा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगड येथे ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली.
यावेळी फडणवीस यांनी शिवछत्रपतींचे आशीर्वाद, शिवसंस्कारांची प्रेरणा... अशा भावना व्यक्त करणारी पोस्ट केली
तसेच फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी व समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रमास' उपस्थिती लावली
यावेळी शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्यामार्फत प्रकाशित 'शिवरायमुद्रा स्मरणिका' आणि डॉ. अशोक बांगर लिखित 'धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर' या पुस्तकांचे प्रकाशन केले.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किल्ले रायगड येथे पुरस्कारप्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आले
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधीत केले. त्यांनी जय भवानी, जय शिवाजी! छत्रपती शिवाजी महाराज की जय! म्हणत जयघोष केला