Jagdish Patil
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित अनिलचंद्र शाह यांचा आज (22 ऑक्टोबर) वाढदिवस आहे.
पक्षाचा एक कार्यकर्ता ते देशाचे गृहमंत्री पद भूषवणाऱ्या अमित शहांचा राजकीय प्रवास कसा आहे ते जाणून घेऊया.
अमित शाह राजकारणात येण्यापूर्वी प्लास्टिक पाईप्सचा कौटुंबिक व्यवसाय पाहात होते.
ते आपल्या राजकीय कारकीर्दीत एकही निवडणूक हरले नाहीत. भाजपच्या उत्तुंग यशामागे त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो.
1982 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींची पहिल्यांदा भेट घेतली. तेव्हा ते अहमदाबादच्या महाविद्यालयात शिकत होते. त्यावेळी मोदी संघ प्रचारक होते.
1986 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. 1990 सालच्या लालकृष्ण आडवाणीच्या सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रेत मोदी आणि शहांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
1997 मध्ये गुजरातमधील सरखेज विधानसभेची पोट निवडणूक जिंकून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
2009 मध्ये ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, तर 2004 मध्ये अध्यक्ष झाले. 2003 ते 2010 गुजरातचे गृहमंत्री होते.
2019 मध्ये गांधीनगरमधून ते संसदेत निवडून गेले. 30 मे 2019 रोजी, दुसर्यांदा केंद्रात भाजप सरकार स्थापन होताच शहांची देशाच्या गृहमंत्रिपदी वर्णी लागली.