Jagdish Patil
भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या विजया रहाटकर या पहिल्याच मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली आहे.
महाराष्ट्र BJP युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास आहे.
त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्या राहिले असून सध्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून काम करताहेत.
2007 ते 2010 या कालावधीत त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या (तत्कालीन औरंगाबाद) महापौरपदाची धुरा सांभाळली आहे.
विजया रहाटकर यांनी पुणे विद्यापीठातून भौतिक शास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
'विधिलिखित', 'अग्निशिखा धडाडू द्या', 'औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स', 'मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम' अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केलं आहे.