Jagdish Patil
यकृत दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी फिटनेस संदर्भात तरुणांना आरोग्यदायी मंत्र दिला.
यावेळी त्यांनी आपलं जीवन कसं आणि कशामुळे बदललं याचं रहस्य देखील सांगितलं.
19 एप्रिल रोजी जगभरात यकृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना शहांनी फिटनेसबद्दल मार्गदर्शन केलं.
यावेळी शहांनी त्यांच्या प्रकृतीबाबतचे किस्से सांगितले. ते म्हणाले, "मी माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणला आहे."
शरीराला आवश्यक तेवढी झोप घेऊन, पाणी पिऊन, आवश्यक तेवढेच अन्न खाऊन आणि नियमित व्यायाम करून मी माझ्या आयुष्यात खूप काही साध्य केलं आहे.
शिवाय जीवनात हे बदल केल्यामुळे जवळपास साडे 4 वर्षांपासून कोणतंही अॅलोपॅथिक औषधं आणि इन्सुलिन न घेता तुमच्यासमोर मी उभा आहे.
यावेळी तरूणांना फिट राहण्याबाबतचा सल्ला दिला. ते तरुणांना उद्देशून म्हणाले, तुमच्या शरीरासाठी 2 आणि मनासाठी 6 तास झोप घ्या.
शिवाय मला जर 4 वर्षांपूर्वी आमंत्रित केलं असतं तर मी इथे बोलण्या लायक नव्हतो त्यामुळे मी कार्यक्रमाला आलो नसतो, अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली.