Jagdish Patil
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिताचा विवाह सोहळा शुक्रवारी पार पडला.
हर्षिता केजरीवाल यांचा विवाह संभव जैन यांच्याशी झाला.
या विवाह सोहळ्यानंतर केजरीवाल यांचे जावई बनलेले संभव जैन नेमके कोण आहेत? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
संभव जैन हे IIT दिल्लीचे पदवीधर असून ते एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजमेंट सल्लागार आहेत.
आयआयटी दिल्ली येथे शिकत असतानाच हर्षिता आणि संभव जैन यांची भेट झाली.
त्यांच्या मैत्रीचं रुपातंर हळूहळू प्रेमात झालं आणि त्यानंतर आता ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे जोडीदार बनले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे हर्षिता आणि संभव यांनी मिळून 'बेसिल हेल्थ' नावाचा एक स्टार्टअप देखील सुरू केलं आहे.