Rashmi Mane
लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तसे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातील दौऱ्यांची संख्या वाढत आहे.
गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येऊन गेले, आता गृहमंत्री अमित शाह खान्देश दौऱ्यावर आहेत.
आज महाराष्ट्रातील अकोला येथे भाजप लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समिती आणि लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक बूथवर पक्ष मजबूत करून मोदीजींच्या '400 पार' या संकल्पाला सिद्धीस नेण्यासाठी मदत करतील असे अमित शाह म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील पाच आणि पूर्व विदर्भातील एक अशा सहा जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अकोल्यात आलेत.
अमित शाह यांच्या अकोला दौऱ्यात अकोला, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, अमरावती लोकसभा मतदारसंघांतून नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित होणार आहे.
जागावाटपाचा कोणताही अधिकृत फार्म्युला अद्याप ठरलेला नाही. त्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोल्यात विदर्भातील सहा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.
R