Rashmi Mane
येत्या काही महिन्यांत लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यापूर्वी या 6 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबद्दल सखोल माहिती घ्या. त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण, कामाचा अनुभव आणि सार्वजनिक सेवेतील ट्रॅक रेकॉर्डबद्दल जाणून घ्या.
विविध राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे वाचा. राष्ट्राच्या भल्यासाठी त्यांचे प्रमुख मुद्दे असतील त्यांना मत द्या.
वेगवेगळ्या राजकीय पक्षांची विचारधारा, धोरणे, आश्वासने समजून घ्या. तुमची मते आणि मूल्ये ज्या पक्षाशी साम्य साधतात, त्या पक्षाला आपले मत द्या.
तुमच्या स्थानिक समस्यांचा विचार करा आणि त्यांच्यावर मार्ग काढण्यासाठी प्रत्येक उमेदवार कशी योजना आखत आहे, याचे आकलन करा आणि त्यानंतरच तुमचं मत ठरवा.
उमेदवारांच्या नेतृत्व गुणांचे मूल्यमापन करून त्या उमेदवाराला समाजासाठी आणि समाजाच्या प्रश्नांवर काम करण्याची इच्छा आहे का हे बघा.
तुमच्या भागातील मतदारांची संख्या जाणून घ्या. जास्त मतदान हे सहसा सक्रिय आणि लोकप्रतिनिधींनाच केले जाते. त्याकडे लक्ष द्या आणि ठरवा की कोणत्या उमेदवाराला मत देणे योग्य राहील.
R