सरकारनामा ब्यूरो
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत दौऱे करत असतात. पण ते बाहेरील पदार्थ खाणे टाळून घरच्या जेवणाला खूप महत्त्व देतात. त्यांना गुजराती ढोकळा खूप आवडतो.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पोहे प्रचंड आवडतात. त्यावर शेव आणि लिंबू टाकून खाणे ते जास्त पसंद करतात.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईचा स्पेशल तंदुर वडापाव खूप आवडतो.
सोनिया गांधी त्यांच्या हेल्थची खूप काळजी घेतात. त्यामुळे त्या फास्टफूड आणि बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळतात, मात्र त्यांना फास्टफूडमध्ये पास्ता आणि पिझ्झा खूप आवडतो. त्यांना कॉफीही प्यायला आवडते.
राहूल गांधी दौऱ्यावर असताना नेहमी अनेक ठिकाणी जात वेगवेगळे पदार्थ खाताना पहायला मिळतात. त्यांना कॉन्टिनेंटल फूड आवडते. यामध्ये त्यांना चिकन टिक्का, सी-फूड्स आणि मोमोज हे पदार्थ फेवरेट आहेत.
नितीन गडकरी यांना स्ट्रीट फूड आवडतात. तसेच त्यांना घरच्या जेवणामध्ये पुरणपोळी, वरण भात खायला आवडतो. फास्टफूडमध्ये त्यांना वडा पाव, भेळ फेवरेट आहे.
ममता बॅनर्जी यांना तळलेले बटाटे खूप आवडतात, ज्याला अनेक ठिकाणी आलू चाप असे म्हणतात.
उद्धव ठाकरेंना थाई शैलीतील खेकड्याचे सूप, घरी बनवलेले पदार्थ आवडतात.त्यांचा आवडता पदार्थ म्हणजे ओबेरॉय हॉटेलमध्ये फ्रांजिपानीमध्ये मिळणारा स्वीट कॉर्न क्रॅब सूप आहे.