Akshay Sabale
पुन्हा सत्तेत येण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी 10 सूत्री कार्यक्रम मांडला आहे. प्रत्येक बुथवर 10 टक्के मतदान वाढवा, असं अमित शहा यांनी सांगितलं.
विजयादशमी ते धनत्रयोद- शीपर्यंत प्रत्येक बुथपर्यंत 11 मोटारसायकलवरून एक तासाचा फेरफटका.
शेतकऱ्यांना योजना सांगा. ऋषी-मुनींचे आशीर्वाद घ्या.
पक्ष सदस्यत्व मोहिमेकडे लक्ष देत सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना पक्षाशी जोडा.
पराभूत सरपंचांना पक्षात आणण्याचे प्रयत्न करा.
बुथ, मंडळ, प्रदेश पातळी वरील कार्यकर्त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडा.
जेथे पक्ष कमकुवत आहे, तेथे शक्तिकेंद्र स्थापन करा.
बुथ पातळीवर मविआच्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडा.
बचतगट व स्वयंसहायता गटांच्या बैठका घ्या