Pradeep Pendhare
आरक्षणाच्या आंदोलनामुळं भाजपच्या मतांवर काहीसा नकारात्मक परिणाम होऊन मतांची तूट निर्माण होण्याचा धोका आहे.
मतांची तूट भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे तीन हजार मेळावे घेण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठरवलं आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका क्षेत्रातील या मेळाव्यातून लाभार्थ्यांचे सत्कार करण्याच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना
निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर केवळ 36 मते वाढली, तरी भाजप उमेदवार निवडून येईल, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा
एक कोटी 60 लाख महिलांना प्रतिमाह 1500 रुपये दिले जातात. लाभार्थ्यांची संख्या 2.50 कोटींपर्यंत वाढवत न्यायचे भाजपचे लक्ष आहे.
महिलांमध्ये जाती धर्माच्या पुढे जाऊन मतदान करतात. महिलांमध्ये सकारात्मकता आहे. त्यावर काम करण्याच्या भाजप नेत्यांच्या सूचना
दसऱ्यापासून दिवाळीच्या धनत्रयोदशीपर्यंत मोटार सायकल रॅली, लाभार्थींच्या गाठीभेटी, असे अनेक कार्यक्रम अमित शहा यांनी भाजप नेत्यांना दिलेत.