Sachin Fulpagare
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. नाशिकमध्ये त्यांचा जंगी रोड शो झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही महिन्याभरात नाशिकचे दौरे झाले. यासह केंद्रातील प्रमुख मंत्र्यांनीही याच महिन्यात नाशिकचा दौरा केला आहे.
22 जानेवारीला उद्धव ठाकरेंचाही नाशिक दौरा झाला. काळाराम मंदिरात त्यांनी दर्शनही घेतले. तसेच ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशनही नाशिकमध्ये झाले. उद्धव ठाकरेंचेही भाषण झाले.
आता केंद्रीय मंत्री अमित शाहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही प्रमुख नेते नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने 27 व 28 जानेवारीला राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे आयोजन आयोजन केले आहे. या परिषदेला शाहा आणि मुख्यमंत्री शिंदे येणार आहेत.
27 तारखेला सकाळी 10 वाजता परिषेदेचे उद्घाटन अमित शाहांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
परिषदेचा समारोप 29 जानेवारीला होणार आहे. समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही असणार आहेत.