Rashmi Mane
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता राम मंदिराचे स्वप्न साकार झाले आहे. भगवान श्रीराम त्यांच्या राम मंदिरात सिंहासनावर विराजमान आहेत. 22 जानेवारी रोजी अभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
श्री रामाच्या मूत्तीला मौल्यवान रत्नांनी जडलेल्या दागिन्यांनी सजवले आहे.भगवान श्रीरामाचे कपडे आणि दागिने अतिशय बारकाईने तयार करण्यात आले आहेत. असे मानले जाते की आठवड्यातील 7 दिवस भगवान श्रीराम वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसतील.
सोमवारी पांढऱ्या कपड्यात, मंगळवारी लाल, बुधवारी हिरवा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी मलई रंग, शनिवारी निळा आणि रविवारी गुलाबी कपड्यांमध्ये भगवान श्रीरामाचे अलौकिक रूप पाहायला मिळणार आहे.
मंदिरात सकाळी 6:30 ते दुपारी 12:00 पर्यंत, नंतर दुपारी 2:00 ते रात्री 10:00 पर्यंत पाहता येईल. गर्दीच्या परिस्थितीनुसार दर्शनाची वेळ वाढू किंवा कमी होऊ शकते.
मंगळवारी श्री रामाच्या मूर्तीला लाल कपडे घालण्यात आले होते.
रोज पहाटे 4:30 वाजता मंगल गीत गायनाने रामलल्लाचा जागर करण्यात येणार आहे. यानंतर रामाची मंगल आरती करण्यात येईल.
प्रभू श्रीराम दररोज दुपारी 12:00 ते 2:00 या वेळेत २ तास मंदिर राहणार बंद.
दिवसातून तीन वेळा रामलल्लांची आरती होईल. आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला ट्रस्टकडून पास घेणे अनिवार्य असेल, ज्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पध्दतीने पास काढू शकता. ऑनलाइन पास मिळविण्यासाठी, तुम्हाला ट्रस्टच्या वेबसाइट srjbtkshetra.org वर नोंदणी करावी लागेल.