सरकारनामा ब्यूरो
अमित शाह हे मेघालय आणि आसाम या राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
ढोल आणि झांजांसह धार्मिक नृत्य सादरीकरण करत जनतेने पारंपरिकरित्या त्यांचे स्वागत केले.
आसामच्या ऐतिहासिक महाभैरव मंदिराला त्यांनी भेट दिली आणि स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासोबत त्यांनी मंदिरात पूजा केली.
स्वच्छता मोहिमेत अमित शाहांसोबत शर्मा यांनीही आवर्जून सहभाग घेतला.
स्वच्छता करताना त्यांनी जनतेशी आणि पत्रकारांशी संवाद साधताना पुढील नियोजनाबद्दल माहिती दिली.
अमित शाह हे तेजपूरच्या सशस्त्र सीमा दलाच्या 60 व्या स्थापना दिनाला तसेच ढेकियाजुलीच्या बाथौ महासभेच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
अमित शाह यांनी अंगणातील आवारात स्वच्छता करतानाचे फोटो माध्यमांवर शेअर केले.