Amit Thackeray Net Worth : लाखो रूपये, म्युच्युअल फंड, शेअर्स ; कोट्यवधींचे मालक आहेत अमित ठाकरे..!

सरकारनामा ब्यूरो

अमित ठाकरे

अमित ठाकरे महाराष्ट्र 2024 विधानसभेची निवडणूक माहीम या मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत.

Amit Thackeray | Sarkarnama

संपत्तीचा आकडा जाहीर

अमित ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीचा आकडा जाहीर केला आहे. जाणून घेऊयात किती आहे मालमत्ता.

Amit Thackeray | Sarkarnama

 एकूण संपत्ती

अमित ठाकरे यांच्याकडे एकूण 12 कोटी 54 लाख जंगम मालमत्ता तर 1 कोटी 29 स्थावर मालमत्ता असल्याचं त्यांनी शपथपत्रात जाहीर केलं आहे. 

Amit Thackeray | Sarkarnama

यामध्ये त्यांचा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झिक्यूटीव्ह अशा नावाने स्वता:चा बिजनेस देखील आहे. तर त्यांच्याकडे 1 लाख 8 हजार इतकी रोख रक्कम असून त्यांच्या नावे 4 कोटी 19 लाख रुपयांचं  कर्ज सुध्दा आहे.

Amit Thackeray | Sarkarnama

बँक खात्यात ठेवी

त्याचबरोबर बँक खात्यात 6 कोटी 29 लाखाच्या ठेवी असून 3 कोटी 98 लाख रुपयांचे कंपनी शेअर्स आहेत. सह्याद्री फिल्ममध्ये 50 टक्के शेअर्स आणि तथास्तु बिल्डर्समध्ये देखील 20 टक्के शेअर्सची गुतंवणूक केली आहे.

Amit Thackeray | Sarkarnama

दागिने

एकूण 3 तोळे सोने तर पोस्ट खात्यामध्ये 20 लाख रुपये आहेत.

Amit Thackeray | Sarkarnama

पत्नीच्या नावी संपत्ती

त्यांच्या पत्नीच्या नावे 1 कोटी 72 लाख रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 9 तोळे सोने 5 कोटी 93 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. त्याबरोबर म्युचूअल फंडमध्ये 52लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे

Next : 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा'

येथे क्लिक करा...