Amol Kirtikar : ठाकरेंचे शिलेदार अमोल कीर्तिकरांचं विरोधकांना धडकी भरवणारं 'शक्ति'प्रदर्शन!

Deepak Kulkarni

आरंभ...

लोकसभा उमेदवारी अर्ज भरायला घरातून निघताना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मला मोलाची साथ देणारी माझी अर्धांगिनी सौ. सुप्रिया यांनी औक्षण केले.

Amol Kirtikar | Sarkarnama

शिवतीर्थ येथे नतमस्तक

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ शिवतीर्थ येथे नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केले.

Amol Kirtikar | Sarkarnama

साहेबांचे स्मरण...

निष्ठावंत शिवसैनिकांचे मंदिर "मातोश्री" मधील "गाभारा" हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत साहेबांचे स्मरण करत नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

Amol Kirtikar | Sarkarnama

विराट रॅली

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गटाचे उमेदवारी अमोल कीर्तीकर यांनी विराट रॅली काढली.

Amol Kirtikar | Sarkarnama

विरोधकांच्या गोटात गर्मी वाढवणारा

मुंबईच्या वाढत्या तापमानात उपस्थित राहिलेला जनसागर विरोधकांच्या गोटात गर्मी वाढवणारा असल्याचे कीर्तीकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Amol Kirtikar | Sarkarnama

पहिल्यांदाच निवडणूक

लोकसभा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच निवडणूक लढताना ही विराट गर्दी सुखद वाटणारी होती.

Amol Kirtikar | Sarkarnama

गुलाल उधळण करत "मशाल"

आभाराचे "हात" जोडून विजयाची "तुतारी" वाजवून "झाडू" ने विरोधक साफ करून गुलाल उधळण करत "मशाल" घेऊन एकजुटीने विजयोत्सव साजरा करू हा विश्वास आहे.

Amol Kirtikar | Sarkarnama

विकासाचा नवा मार्ग...

सहकारी व मतदारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली असून विजयाची क्रांतीची "मशाल" पेटवून विकासाचा नवा मार्ग द्यायला तयार आहे.

Amol Kirtikar | Sarkarnama

सर्वांचा ऋणी

महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक, अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.

Amol Kirtikar | Sarkarnama

अर्ज दाखल

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Amol Kirtikar | Sarkarnama

NEXT : शरद पवारांसोबत रोहित पाटलांची हवाईसफर