Aslam Shanedivan
आपल्याकडील पुरूषप्रधान संस्कृतीत अनेकांना वंशाचा दिवा हवा असतो. पण मुलगी झाल्यास नाक मुरडले जाते. ती पणती नकोशी होते.
असेच काहीसे संजीता महापात्रा यांच्याबद्दल झाले होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबाने जवळजवळ सोडूनच दिले होते
परंतु त्यांच्या मोठ्या बहिणीने हट्ट धरल्यामुळे आज त्या यशाच्या शिखरावर पोहचल्या आहेत.
संजीता महापात्रा यांचा जन्म ओडिशातील राउरकेला येथील एका गरीब कुटुंबात झाला. मात्र यांच्या जन्माने सर्वच दु:खी होते. त्यांनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. यामुळे आपले शिक्षण सामाजिक संस्था, शिक्षक आणि शिष्यवृत्तींच्या मदतीने पूर्ण केले.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी केली.
पण त्यांचे ध्येय प्रशासकीय अधिकारी होण्याचे होते. अथक प्रयत्नानंतर पतीच्या पाठिंब्यामुळे पाचव्या प्रयत्नात त्या 2019 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाल्या.
अमरावती जिल्हा परिषदेच्या त्या सीईओ असून तेथील शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी काम करत आहेत.