सरकारनामा ब्यूरो
ज्या संस्थेमार्फेत सरकारी नोकरीसाठी परीक्षा घेतली जाते तीच संस्था अनेकांना माहिती नसते. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय भर्ती एजन्सी (एनआए) कडून सरकारी नोकरीसाठी परीक्षा आयोजित केल्या जातात.
पी. बाला किरण यांच्याकडे राष्ट्रीय भर्ती एजन्सी (NRA) चे सचिव सह नियंत्रकाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. ते 2008 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मध्ये चार वर्षे काम केले आहे.
पी बाला किरण सध्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामध्ये अतिरिक्त सहसचिव पदावर कार्यरत आहेत.
किरण त्यांच्या नवीन पदाचा कार्यभार येत्या शनिवारी (ता.25) स्वीकारणार आहेत.
किरण यांची नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल. त्याआधी त्यांच्या जागेवर दुसरा अधिकाऱ्याला नियुक्ती दिल्यास त्यांना कार्यभार सोडावा लागेल.
सचिव सह परीक्षा नियंत्रक म्हणून किरण हे भरती प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत. या पदाचा उद्देश विविध प्रकारच्या सरकारी नोकरीच्या भरती प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे आहे.
किरण यांनी हैदराबादमध्ये क्षेपणास्त्रात शास्त्रज्ञ म्हणूनही काम केले. त्यांना दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते IAS अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.