सरकारनामा ब्यूरो
UPSC ही सर्वात कठीण परीक्षेपैकी एक आहे. या परीक्षा पास करण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात तरीही त्यांना अपयश येते मात्र, अमृत जैन असे IPS अधिकारी आहेत ज्यांनी तब्बल 4 वेळा UPSC परीक्षा दिली आणि ती पासही केली.
अमृत जैन हे सध्या उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात एएसपी म्हणजेच सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील राहिवासी असलेले अमृत जैन यांनी एनआयटी वारंगल विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकची पदवी मिळवली.
पदवी मिळवल्यानंतर त्यांनी हैदराबादमधील एका खाजगी कंपनीत काम केले. परंतु काही दिवसात त्यांनी ही नोकरी सोडली आणि UPSC परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
अमृत जैन यांनी 2016 मध्ये UPSC ची परीक्षा दिली. परीक्षा देण्याआधी त्यांनी अभ्यास न केला नसल्याने ते नापास झाले.
अमृत जैन यांनी वर्षभर चांगला अभ्यास केल्यानंतर 2018 ला युपीएससी परीक्षा दिली. परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय संरक्षण खाते सेवा (IDAS) पदावर रुजू झाले.
अमृत यांनी त्यानंतर सलग तीन वेळा UPSC परीक्षा दिली आणि तिन्ही वेळेला ते यशस्वी झाले. 2019ला त्यांना 321वा रँक,2020 मध्ये 96 रँक आणि 2021 मध्ये 179 रँक मिळाला.
चार वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुनही त्यांना आयपीएस अधिकारी हे पद मिळाले. त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.