Deepak Kulkarni
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज, उदयनराजे भोसले हे साताऱ्यातच नाही तर राज्यात लोकप्रिय आहे. बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी ते ओळखले जातात.
सर्वसामान्यांत मिसळणं, भावनिक स्वभावामुळे उदयनराजे हे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. कॉलर उडविण्याच्या त्यांच्या स्टाईलवर तरुणाई एकदम फिदा आहेत.
24 फेब्रुवारी 1966 रोजी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा जन्म झाला. त्यांच्या समर्थकांकडून त्यांचा प्रत्येक वाढदिवस प्रचंड जल्लोषात साजरा केला जातो.
याही वर्षी खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारापासून राजेंना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थकांना ठिकठिकाणी गर्दी केली होती.
लाखो रुपयांची फटाक्यांची आतषबाजी आणि आठ फुटी केक कापून वाढदिवस साजरा केला.
सातारा येथील उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथे पुण्यातल्या शिवाजीनगर येथून आलेल्या समर्थकांनी चांदीचं सिंहासन भेट देण्यात आले.
उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी मोठ्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती.
साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आलं. उदयनराजे यांना आलिशान कार आणि बाईकची भारी आवड आहे.
उदयनराजेंच्या ताफ्यात अनेक आलिशान कार आणि महागड्या दुचाकी आहेत. त्यांच्या ताफ्यात जवळपास 10 वाहनं आहेत. उदयनराजे अनेकदा स्कूटर, बाईकवर लोकांना भेटायला जातात.