Amrut Scheme : 'ओपन' मधील विद्यार्थ्यांसाठी ‘अमृत’: गरजुंना आधार देणारी योजना

Rashmi Mane

‘अमृत’

तुम्ही खुल्या प्रवर्गातले आहात आणि स्वप्नं मोठी आहेत, पण आर्थिक अडचणी आड येतायत? मग ओळखा – ‘अमृत’ या तुमच्या साथीदार संस्थेला!

Amrut Scheme for Open Category Student | Sarkarnama

काय आहे ‘अमृत’?

महाराष्ट्र शासनाची अशी स्वायत्त संस्था जी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे.

Amrut Scheme for Open Category Student | Sarkarnama

आर्थिक मदत करणारी संस्था

(महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षण आणि व्यवसाय या सगळ्यांसाठी आर्थिक मदत करणारी संस्था.

Amrut Scheme for Open Category Student | Sarkarnama

स्पर्धा परीक्षेसाठी साथ

UPSC ची मुलाखत असो की MPSC ची तयारी 50,000 पर्यंतची आर्थिक मदत अमृतकडून मिळू शकते!

Amrut Scheme for Open Category Student | Sarkarnama

उत्तम शिक्षणाची संधी

IIT, IIM, AIIMS मध्ये शिकायचं स्वप्न असो अमृत 10,000 रु. प्रति महिना तुमच्या शिक्षणासाठी देतं!

Amrut Scheme for Open Category Student | Sarkarnama

प्रशिक्षण – तुमचं हत्यार

‘स्वरोजगार’, ‘बेकरी’, ‘संगणक’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’ विनामूल्य प्रशिक्षण मिळवा आणि स्वतःला घडवा!

Amrut Scheme for Open Category Student | Sarkarnama

व्यवसायासाठी कर्ज मदत

15 लाखांपर्यंत कर्ज घेतलंय का? तर त्याचं व्याजही अमृत तुमच्यासाठी फेडणार! टायपिंग आणि लेखनात रस असेल तर राज्य परीक्षा परिषदेच्या मदतीने टायपिंग व लघुलेखनासाठी देखील आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

Amrut Scheme for Open Category Student | Sarkarnama

कोठे संपर्क साधाल?

अमृत कार्यालय: उद्योग भवन, औंध, पुणे
वेबसाइट: www.mahaamrut.org.in
मेल: info@mahaamrut.org.in

Amrut Scheme for Open Category Student | Sarkarnama

Next : व्यवसाय करायचाय, मग हे वाचाच! मोदी सरकारची ही योजना तुमचं स्वप्न करेल पूर्ण... 

येथे क्लिक करा