Sachin Fulpagare
राज्यात घडणाऱ्या गोळीबार आणि हत्येच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्याभरात तीन वेळा लोकप्रतिनिधींवर जीवघेणे हल्ले झाले असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
अमृता फडणवीस यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
श्रीरामाने वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवास पत्करला होता. परंतु काही लोक सत्तेसाठी वडिलांच्या शब्दांनाच विसरतात, असा टोला अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
प्रभू श्रीरामांनी वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवास स्वीकारला होता. पण इथे काही लोक असेही आहेत, ज्यांना सत्तेसाठी वडिलांचा शब्दही लक्षात राहत नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सदैव तत्पर आहेत. राज्यात शांतता राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस लक्ष देतील, असेही त्या म्हणाल्या.
निखिल वागळे यांच्यावर यापूर्वी अनेकदा हल्ले झाल्याची मला माहिती आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांच्याकडून अनेकदा दुरुपयोग होतो, असे त्यांनी सांगितले.
निखिल वागळेंनी भान आणि मर्यादा राखून बोलायला हवे आणि लोकांनीही हिंसाचार केला नाही पाहिजे, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.