Sachin Waghmare
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून “नमो कुस्ती महाकुंभ” कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
“नमो कुस्ती महाकुंभ” कुस्ती स्पर्धेस जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
जामनेर येथील कुस्ती स्पर्धेला खासदार रक्षा खडसेंनी हजेरी लावली.
देशभरातील रथी-महारथीं यामध्ये सहभागी झाले होते.
ही दंगल पाहण्यासाठी जामनेरमध्ये कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळला होता.
जागतिक कीर्तीच्या खासबाग आखाड्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या स्टेडियममुळे महाराष्ट्र केसरीमध्ये १०० पेक्षा अधिक पैलवानांच्या द्वंद्वाचा अनुभव लाभला.
‘नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा’ हा मंत्र तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयामुळे मंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला.
जामनेर येथे गोविंद महाराज क्रीडांगणावर मोठी व्यवस्था करण्यात आली होती.
१३ दंगलीतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला.