Rashmi Mane
धर्मवीर, कट्टर शिवसैनिक, आनंद दिघे यांची आज ( 27 जानेवारी ) जयंती.
आनंद दिघे यांच्या निधनाला 21 वर्षे उलटून गेली तरीही त्यांचा आदर करणारा एक मोठा वर्ग ठाण्यात आहे.
ठाण्यातील टेंभी नाका परिसरात राहणाऱ्या आनंद यांना बाळासाहेबांच्या वक्तृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडली होती. ७० च्या दशकात ते शिवसेनेचे कार्यकर्ते बनले.
ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात शिवसेनेला आनंद दिघे यांच्या रूपाने पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला होता. दिघे यांची मेहनत पाहून शिवसेनेने त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली.
आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरात ‘आनंद आश्रम’ स्थापन केला. या आश्रमात रोज सकाळी 'जनता दरबार' होत असे.
समस्येने वेढलेले लोक सकाळी सहा वाजल्यापासून आनंद आश्रमात जमायचे. ते लोकांच्या तक्रारी ऐकून लोकांना मदत करायचे. या मेळाव्यामुळे प्रशासनाच्या सर्व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दिघे यांनी अतिशय कठोर धार्मिक धोरण पाळले. टेंभी नाका येथे नवरात्रोत्सव सुरू करणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांनी पहिला दही-हंडी उत्सव सुरू केला. या सर्व धार्मिक उपक्रमांमुळे 'धर्मवीर' निर्माण झाला.