Jagdish Patil
आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीमुळे राज्यात नवं राजकीय समीकरण उदयास आलं आहे.
रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेच्या युतीची एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत आज घोषणा केली.
आगामी स्थानिकच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत दलित मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ही युती केल्याचं बोललं जात आहे.
हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढवतील. तर शिंदेंसोबत युती करणारे आनंदराज आंबेडकर कोण आहेत ते जाणून घेऊया.
आनंदराज यशवंत आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आहेत.
त्यांनी 1998 मध्ये 'रिपब्लिकन सेना' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. ज्याचे ते अध्यक्ष असून आंबेडकरी चळवळीतील नेते अशी त्यांची ओळख आहे.
2011 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा प्रकरणी आनंदराज आंबेडकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश केला होता.
यावेळी तब्बल 26 दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं, तेव्हापासून त्यांचा पक्ष चांगलाच चर्चेत आला.
त्यांनी पुण्यातून 10 वीचं, तर रुईया कॉलेजमधून बारावीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर VJTI मुंबई मधून अभियांत्रिकी ईलेक्ट्रिकलची पदवी घेतली आणि बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून MMS पदवी घेतली.