Jagdish Patil
इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील जागतिक बाजारातील आघाडीची कंपनी टेस्लाने भारतात आपली स्मार्ट कार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात लाँच केली.
टेस्लाने सुरू केलेल्या या एक्स्पेरियन्स सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं.
तर, टेस्ला कंपनीकडून भारतात लाँच केलेल्या इलेक्ट्रिक कार Model Y ची किंमत आणि वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया.
टेस्ला मॉडेल वायच्या RWD व्हर्जनची किंमत 61.07 लाख, तर LR RWD व्हर्जनची 69.15 लाख इतकी आहे.
ग्राहकांना जर आवडीचा रंग पाहिजे असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Tesla 3 LR RWD कार एकदा चार्जिंग केल्यानंतर 622 किमीपर्यंत प्रवास करु शकते. तर RWD व्हर्जनची कार 500 किमीचा प्रवास करू शकते.
सध्या ही कार देशाची राजधानी दिल्लीसह गुरुग्राम आणि मुंबईत उपलब्ध आहे.
टेस्लाची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात 0 ते 100 KM इतका वेग गाठते.
मॉडेल Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार असून जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.