Sunil Balasaheb Dhumal
अमरावती लोकसभा मतदारसंघावरून महायुतीतील शिंदे गट आणि भाजपमध्ये टशन झाली.
हा मतदारसंघात भजापकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाचे इच्छुक आनंदराव आडसूळ नाराज झाले.
आडसूळ यांनी उघडपणे राणांविरोधात विधाने केली. त्यांनी आपला पवित्रा कायम ठेवला आहे.
अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव होणार असल्याचे भाकीतच आडसूळांनी केले.
या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल, असेही ते म्हणाले.
आनंदराव आडसूळ हे अमरावतीतून तीनदा तर बुलढाण्यातून एकदा खासदार होते.
त्यांचा २०१९ मध्ये नवनीत राणांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या जोरावर पराभव केला.
आता 2024 मध्ये राणा निवडणुकीसाठी प्रचंड इच्छुक होते. मात्र भाजपकडे जागा गेल्याने त्यांचा पत्ता कट झाला.