Akshay Sabale
लोकसभा निवडणुकीचं पाच टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. 428 जागांवरील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जून रोजी निकाल येणार आहे.
मतदान झालेल्या 428 पैकी 409 जागांचं विश्लेषण करण्यात आलं आहे. त्यातील 258 जागांवर 2019 च्या तुलनेमध्ये मतदानाच्या टक्केवारीत घट पाहायला मिळत आहे.
त्यासह 88 जागांवर 2019 च्या तुलनेत मतांच्या संख्येतही घसरण झाली आहे.
केरळच्या 20 जागांवर मतदानाच्या टक्केवारीत घट पाहायला मिळत आहे. तर, 12 जागांवर 2019 च्या तुलनेत मतांच्या संख्येतही कमी नोंद झाल्याचं दिसत आहे.
उत्तराखंडमधीलही पाच जागांवर मतदानाच्या टक्केवारीत घट नोंदवण्यात आली आहे.
राजस्थान आणि तामिनाडूतील 90 टक्के जागांवर कमी मतदानाची टक्केवारी नोंदवली आहे. तर, अर्ध्या जागांवर मतदारांच्या संख्येतही घट झाली आहे.
गुजरातमध्ये 2019 च्या तुलनेत 25 टक्के जागांवर कमी मतदान झालं आहे.
बिहारमध्ये 2019 च्या तुलनेत 24 पैकी 21 जागांवर कमी मतदान झालं. मात्र, एकाच जागेवर मतांची संख्या कमी नोंदवली आहे.
महाराष्ट्रातील 48 पैकी 20 जागांवर मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. पण, सहा जागांवर मतांची संख्या कमी नोंदवली आहे.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये एकाही ठिकाणी मतांच्या टक्केवारी घट झाली नाही. पण, काही ठिकाणी कमी मतदान झालं.
छत्तीसगडमध्ये प्रत्येक ठिकाणी मतदान आणि मतांची संख्या जास्ती होती.