Chandrababu Naidu: सासऱ्याची खूर्ची हिसकावून झाले मुख्यमंत्री; कोण आहेत एन.चंद्राबाबू नायडू

Mangesh Mahale

युवा काँग्रेस नेता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला होता. आणिबाणीनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

1978 मध्ये चंद्रगिरी विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

1980 मध्ये अभिनेता आणि TDPचे संस्थापक एन टी रामाराव (NTR)यांची कन्या नारा भुवनेश्वरी यांच्यासोबत त्यांनी विवाह केला.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

1983 मध्ये विधानसभेत टीडीपीच्या उमेदवारानं त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

1995 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सासरे एन टी रामाराव यांच्याविरोधात बंड केले. बहुमत सि्द्ध करुन स्वत: मुख्यमंत्री झाले.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

2004 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर काही कारणामुळे त्यांना सत्ता गमवावी लागली. 2014 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

2019 मध्ये त्यांचा जगन रेड्डी यांच्या वाईएसआरसीपीकडून पराभव झाला. हाय-टेक हैदराबादचे मुख्य शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला त्यांनी बाहेरुन पाठिंबा दिला होता. सरकार स्थापन करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

तेलुगू देशम पार्टी के अध्यक्ष, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांचा आज वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

N. Chandrababu Naidu | Sarkarnana

NEXT : गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबतची 'ही' खास गोष्ट अनेकांंना माहिती नाही

येथे क्लिक करा