Gunaratna Sadavarte Biography: गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबतची 'ही' खास गोष्ट अनेकांंना माहिती नाही

Deepak Kulkarni

मराठा आरक्षण ते हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा...

मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचा संपापासून ते आत्ता सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यांवर आवाज उठवत चर्चेत राहिलेले व्यक्ती म्हणजे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे होय.

Advocate Gunaratna Sadavarte | Sarkarnama

नांदेड ते मुंबई हा प्रवास

सदावर्ते यांचा हायकोर्टातील वकील होण्यापर्यंतचा नांदेड ते मुंबई हा प्रवास कसा आहे याबाबत जाणून घेऊयात.

Advocate Gunaratna Sadavarte | Sarkarnama

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म

अ‍ॅड. सदावर्ते हे मूळचे नांदेड येथील असून त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

Advocate Gunaratna Sadavarte | Sarkarnama

वडील पोलीस खात्यात, भाऊ डॉक्टर

त्यांचे वडील निवृत्ती सदावर्ते हे पोलीस खात्यात होते. त्यांना गुणरत्न व राजरत्न सदावर्ते ही दोन मुले आहेत. गुणरत्न सदावर्ते हे हायकोर्टात वकील तर त्यांचे बंधू डॉ. राजरत्न हे मुंबईत डॉक्टर आहेत.

Advocate Gunaratna Sadavarte | SARKARNAMA

LLM पर्यंत शिक्षण

त्यांचे BDS चे वैद्यकीय शिक्षण, LLB आणि LLM पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केली आहे.

Advocate Gunaratna Sadavarte | Sarkarnama

वैवाहिक माहिती...

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील याही मुंबई हायकोर्टात वकील असून त्यांना झेन आणि योना नावाच्या दोन मुली आहेत.

Advocate Gunaratna Sadavarte | Sarkarnama

एक वर्षे डॉक्टर म्हणून नोकरी

विशेष आणि महत्त्वाची बाब म्हणजे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय रुग्णालयात 1999 साली एक वर्षे डॉक्टर म्हणून नोकरी केली आहे.ही त्यांच्याबाबतची खास बाब अनेकांना माहिती नाही.

Advocate Gunaratna Sadavarte | Sarkarnama

2002 सालापासून मुंबई हायकोर्टात वकिली

गुणरत्न सदावर्तेंनी 2002 सालापासून मुंबई हायकोर्टात वकिली करण्यास सुरुवात केली आहे.

Gunaratna Sadavarte | Sarkarnama

गाजलेले आंदोलनं आणि खटले...

मराठा आरक्षण, अनिल देशमुख मनीलॉंड्रिंग, एसटी महामंडळ कर्मचारी विलिनीकरण, यांसारखी अनेक गाजलेल्या आंदोलनं आणि खटल्यात त्यांनी वकील म्हणून कायदेशीर लढा लढला आहे.

Advocate Gunaratna Sadavarte | Sarkarnama

NEXT : भारताची फाळणी केलेल्या 'जिन्नांचं' मुंबईतील अलिशान घर पाहिलंत का?

mohommad-Ali-Jinna-3.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...