YS Sharmila : मुख्यमंत्री भावाला टक्कर देण्यासाठी बहीण जाणार काँग्रेसमध्ये?

Rajanand More

मोठा राजकीय वारसा

शर्मिला या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या कन्या व मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या धाकट्या भगिनी आहेत.

YS Sharmila | Sarkarnama

भावासाठी राजकीय आखाड्यात

वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर जगनमोहन यांनी वायएसआर काँग्रेस पक्ष काढला. ते तुरुंगात गेल्यानंतर शर्मिला यांनी भावासाठी राज्यभर पदयात्रा काढून वातावरण तयार केले.

YS Sharmila, CM Jagan Mohan Reddy | Sarkarnama

भाऊ मुख्यमंत्री झाला अन् राजकारणापासून दूर

जगनमोहन मुख्यमंत्री झाल्यानंतर शर्मिला राजकारणापासून दूर गेल्या. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत सतत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या.

YS Sharmila | Sarkarnama

नवा राजकीय पक्ष

शर्मिला यांनी आंध्र प्रदेशातील राजकारणात सक्रीय सहभाग घेतला नाही. त्यांनी 2021 मध्ये वायएसआर तेलंगणा पक्षाची स्थापना करत के. चंद्रशेखर राव यांच्यासमोर आव्हान उभे केले.

YS Sharmila | Sarkarnama

तेलंगणा ढवळून काढले

हैद्राबादमध्ये जन्मलेल्या शर्मिला यांनी हैद्राबादला कर्मभूमी संबोधत तेलंगणा ढवळून काढले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणामही दिसले.

YS Sharmila | Sarkarnama

काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा

तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला. मतविभाजन टाळण्यासाठी एकही उमेदवार उभा केला नाही.

YS Sharmila | Sarkarnama

विजयात मोठा वाटा

शर्मिला यांनी काँग्रेसला निवडणुकीत पाठिंबा दिल्याने केसीआर यांचा दारूण पराभव. राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसची सत्ता आली.

YS Sharmila | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

तेलंगणातील विजयानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. आपला पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याची शक्यता.

Sonia Gandhi, YS Sharmila, Rahul Gandhi | Sarkarnama

आंध्र प्रदेशात भावाला भिडणार?

जगनमोहन यांना टक्कर देण्यासाठी शर्मिला काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाऊ-बहीण आमनेसामने उभे ठाकणार का, हे लवकरच समजेल.

YS Sharmila | Sarkarnama

NEXT : रावेरचा भावी खासदार कोण? रक्षा खडसे, गिरीश महाजन की एकनाथ खडसे!

येथे क्लिक करा