Pradeep Pendhare
आंध प्रदेशातील लोकसंख्या वाढीसाठी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी मोठी घोषणा केली.
तिसऱ्या बाळाच्या जन्मानंतर 30 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.
चौथ्या बाळाच्या जन्मानंतर 40 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
आंध प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसन्नापेटा इथं ‘स्वर्ण आंध्र स्वच्छ आंध्र’ या मोहिमेत मुख्यमंत्री नायडू यांनी ही घोषणा केली.
सरकारकडून या घोषणेवर सविस्तर तपशील पुढील महिनाभरात जाहीर करणार आहे.
चंद्रबाबू नायडू पूर्वी लोकसंख्या नियंत्रणाचा पुरस्कार करायचे.
आता मात्र जन्मदर वाढवण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे आव्हान चंद्रबाबू नायडू यांनी केलं आहे.
यापूर्वी सरकारने दुसऱ्या बाळासाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडला होता.
आता तिसऱ्या आणि चौथ्या बाळासाठी ही योजना लागू करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घेत, लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न असणार आहे.