Aslam Shanedivan
अँडी बर्नहॅम यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे.
या मंत्रिमंडळातून चार ज्येष्ठ मंत्र्यांची गच्छंती झाली असून वेल्समधील भारतीय वंशाचे खासदार कनिष्क नारायण कायम राहिले आहेत.
खासदार कनिष्क नारायण यांची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मंत्री म्हणून कायम राहिले आहेत.
खासदार कनिष्क नारायण हे वेल्समधील मजूर पक्षाचे असून सप्टेंबर २०२५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या मंत्रिमंडळात ते होते.
त्यांची ‘एआय’ आणि ऑनलाइन सुरक्षा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता नव्या मंत्रिमंडळातही ते असतील.
कनिष्क नारायण यांचा जन्म बिहारमध्ये झाला असून, वयाच्या १२ व्या वर्षी ते कार्डिफला स्थायिक झाले.
येथे कॅथेस हायस्कूलमधील प्राथमिक शिक्षणानंतर नारायण यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पदवी घेतली.
२०२४ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि वेल्समधील ‘वेल ऑफ ग्लॅमॉर्गन’चे खासदार बनले. त्यांनी संसदीय खासगी सचिव म्हणूनही काम पाहिले.