Rahul Gandhi photos : राहुल गांधींच्या 'या' फोटोंनी काँग्रेसला मिळाले नवे बळ

Rajanand More

काँग्रेसचे आंदोलन

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

Rahul Gandhi Protest | Sarkarnama

राजकीय वातावरण बदलले

या आंदोलनाने दिल्लीतील राजकीय वातावरणच बदलून गेले. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समांतर आता काँग्रेसनेही वेगळे आंदोलन उभे केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Rahul Gandhi Protest | Sarkarnama

आक्रमक राहुल गांधी

आंदोलनामध्ये राहुल गांधी यांची आक्रमकता दिसून आली. पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती.

Rahul Gandhi Protest | Sarkarnama

प्रतिकार

राहुल गांधी यांनी पोलिसांना जोरदार प्रतिकार केला. पोलीस व्हॅनमध्ये नेण्यासाठी धडपडणाऱ्या पोलिसांना त्यांनी सर्व ताकदीनिशी विरोध केला. ते अक्षरश: जमिनीवर झोपले होते.

Rahul Gandhi Protest | Sarkarnama

नाकातून रक्त

या झटापटीत राहुल यांच्या नाकाला दुखापत झाली आणि त्यातून रक्त आले. त्यांच्या पांढऱ्या टी-शर्टवरही रक्ताचे थेंब पडले होते.

Rahul Gandhi Protest | Sarkarnama

बळ वाढले

राहुल यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे बळ वाढले. त्यानंतर काही तासांतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्युत वेगाने ऊर्जा संचारल्याप्रमाणे देशभर आंदोलन सुरू झाले.

Rahul Gandhi Protest | Sarkarnama

फोटो व्हायरल

राहुल यांच्या या आंदोलनाचे फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. काँग्रेसकडून नाकातून रक्त येत असलेला फोटोसह अन्य फोटोंचा वापर करत राहुल यांच्या आक्रमकतेला झळाळी देण्याचा प्रयत्न केला.

Rahul Gandhi Protest | Sarkarnama

मंत्री रस्त्यावर

आंदोलनामुळे केंद्रीय मंत्र्यांनाही रस्त्यावर येऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी लागली. काँग्रेसलाही हेच अपेक्षित होते. एकप्रकारे या आंदोलनासमोर सरकार झुकल्याची चर्चा होती.

Rahul Gandhi Protest | Sarkarnama

NEXT : केवळ 101 दिवस खासदार, तडकाफडकी राजीनामा दिलेली 'टॉली क्वीन' कोण?

येथे क्लिक करा.