Vijaykumar Dudhale
अनिल देसाई यांनी 2018 मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवली होती, सध्या ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही वेळच्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार देसाईंच्या स्थावर मालमत्तेत कोणतीही वाढ झालेली नाही.
देसाई यांच्या जंगम मालमत्तेत सहा वर्षांत 2 कोटी 85 लाख रुपये 71 हजार 90 रुपयांची वाढ झाली आहे. देसाईंच्या नावावर 2018 मध्ये 1 कोटी 233 रुपये एवढी मालमत्ता होती, तर 2024 मध्ये ती 3 कोटी 85 लाख 71 हजार 323 रुपये दाखवण्यात आली आहे.
अनिल देसाई आणि त्यांच्या पत्नी प्रीती देसाई यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही
देसाई यांच्याकडे 2018 मध्ये 89 लाख रुपये कर्ज होते, ते 2024 मध्ये कमी होऊन 76 लाख रुपये झाले आहे.
अनिल देसाई यांच्याकडील दागिन्यांतही वाढ झाली आहे. त्यांच्याकडे 2018 मध्ये 15 लाख 1 हजार रुपयांचे दागिने होते, आता 2024 मध्ये त्यांच्याकडे 36 लाख 89 हजार 800 रुपयांचे दागिने आहेत.
देसाईंच्या बॅंकेतील ठेवींतही चांगलीच वाढ झाली आहे. त्यांच्याकडे 2018 मध्ये 80 लाख 80 हजार 233 रुपयांच्या ठेवी होत्या, तर 2024 मध्ये 3 कोटी 6 लाख दोन हजार 692 रुपयांच्या ठेवी आहेत.
अनिल देसाई, त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्या एकत्रित नावावर मुंबईतील ब्रीच कॅंडी येथे 2228.4 चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळाचा फ्लॅट आहे.
देसाई कुटुंबीयांच्या नावावर अहमदाबाद येथे पाच हजार चौरस फुटांचा भूखंड आहे, त्याची 2018 मध्ये किंमत 7 लाख रुपये होती.