Kalyan Dombivali News : श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन; 'पाच लाख मताधिक्याने निवडून येणार...' पाहा फोटो!

Chetan Zadpe

उमेदवार अर्ज दाखल -

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

जोरदार शक्तिप्रदर्शन -

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शन केले.

सगळे रेकॉर्ड्स मोडणार -

कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशिर्वादाने कल्याण डोंबिवली मतदार संघात येत्या निवडणुकीत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले जातील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस उपस्थित -

कल्याण मधील शिंदेंच्या रोड शो दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

विजयाची हॅट्ट्रीक -

विजयाच्या हॅटट्रिकनंतर पुढची पाच वर्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तुमची सेवा करेल, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

रॅलीला तुफान गर्दी -

कल्याण-डोंबिवलीतील आजची गर्दी त्याचीच साक्ष देत आहे. मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या रॅलीतून दिसली.

श्रीकांतची स्वत:ची ओळख -

पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख होती. पण निवडून आल्यानंतर विकास कामातून त्यांनी आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महिलांची मतदारांची उपस्थिती -

या शक्तिप्रदर्शनात मोठ्या प्रमाणात महिला मतदारांनी सहभाग नोंदवला.

NEXT : राज्यातल्या 'या' मतदारसंघात तिरंगी लढत; पाहा यादी!