सरकारनामा ब्यूरो
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना नैतिकतेच्या आधारे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र यापूर्वीही अनेक बड्या नेत्यांना नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला लागला आहे. कोण आहेत ते नेते वाचा...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना सिमेंट घोटाळ्याच्या आरोपांखाली राजीनामा द्यावा लागला होता.
MBBS परीक्षेत मुलीचे 2 मार्क वाढवल्याच्या आरोपामुळे शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी मुख्यमंत्रिपद सोडले होते.
पुण्यात एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा आरोपामुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकी आणि महाराष्ट्राच्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांनाही डाळ घोटाळ्याचे आरोप भोवले होते.
मुंबईवर झालेला दहशतवादी 26/11चा हल्ल्यानंतर नैतिकतेच्या आधारे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मुंबईवर झालेला दहशतवादी 26/11 हल्ल्यानंतर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आर आर पाटील यांना गृहमंत्रिपद सोडावे लागले होते.
आदर्श सोसायटीमध्ये लष्कराशी संबंधित नसलेल्या सदस्यांना फ्लॅट्स दिल्याच्या आरोपानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
राज्यात गाजलेल्या 72 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोपानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप झाला होता. त्यानंतर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.