Kanishka Singh Sagar: पहिली संधी हुकल्यानंतरही कनिष्का यांनी खेचून आणली 'आयएफएस' ची पोस्ट

सरकारनामा ब्यूरो

कनिष्का सिंह सागर

दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षा देण्यासाठी बसतात. पण यामध्ये अनेक विद्यार्थी अपयशी होतात. तरीही ते त्यांचे प्रयत्न न सोडता अनेकदा परीक्षा देतात. आणि परीक्षा उत्तीर्ण होतात. अशीच सक्सेस स्टोरी आहे कनिष्का सिंह सागर यांची.

Kanishka Singh Sagar | Sarkarnama

'दूतनिवास'

कनिष्का सिंह यांनी 2018ला UPSC परीक्षा उत्तीर्ण करत 416 वा रँक मिळवली. त्या आता तुर्कमेनिस्तान येथील अश्गाबात येथे 'दूतनिवास' म्हणून कार्यरत आहेत.

Kanishka Singh Sagar | Sarkarnama

UPSC परीक्षा

कनिष्का यांनी 2017 ला पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली होती. परीक्षेत बसल्यानंतर, त्यांना लवकरच कळाले की, त्या मुख्य परीक्षा पास करू शकणार नसून त्या परीक्षेत अपयशी ठरल्या आहेत.

Kanishka Singh Sagar | Sarkarnama

मॉक टेस्ट न देणं पडलं महागात-

कनिष्क यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्याची परीक्षेची तयारी चांगली नव्हती आणि त्यांना अनेक मॉक टेस्ट न देणं खूप महागात पडलं होतं. यामुळे मी माझ्या चुका लक्षात घेतल्या आणि पुन्हा परीक्षेची तयारी केली.

Kanishka Singh Sagar | Sarkarnama

यशप्राप्ती

त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरु ठेवले आणि 2018ला त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. आणि परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी यश प्राप्त केले.

Kanishka Singh Sagar | Sarkarnama

IFS अधिकारी

चांगली रँक असूनही, कनिष्का यांनी IAS ऐवजी IFS मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय परराष्ट्र सेवेत जाण्याचे त्यांचे सुरुवातीपासूनचे स्वप्न होतं.

Kanishka Singh Sagar | Sarkarnama

IAS अधिकारी अनमोल सागरशी लग्न

दिल्लीच्या रहिवासी असलेल्या कनिष्का यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून मानसशास्त्राची पदवी प्राप्त केली. त्यांनी 2018 मध्ये आयएएस अधिकारी अनमोल सागरशी लग्न केले.

Kanishka Singh Sagar | Sarkarnama

NEXT : Budget Session : राज्यपालांनी महायुती सरकारच्या वाटचालीची दिशा सांगितली, कृषी धोरण ते शक्तिपीठ...

येथे क्लिक करा...